ट्रेनींग व प्रोजेक्ट विषयाच्या माध्यमातून उद्योजकतेचा प्रवास शक्य :- डॉ. जी.टी. वाघामारे
नांदेड :- दिनांक 10 मे 2022. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात वाणिज्य विभागाद्वारे बी. कॉम. तृतीय वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी “ ट्रेनींग अॅण्ड प्रोजेक्ट रायटिंग ” या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी प्रमुख वक्त्ते म्हणून प्रा. डॉ. जी. टी. वाघमारे, वाणिज्य विभागप्रमुख, प्रतिभानिकेतन महाविद्यालय यांनी बी. कॉम. तृतीय वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनींग अॅण्ड प्रोजेक्ट रायटिंग व्यवस्थीत व काळजीपूर्वक कशी करावी. तसेच मौखिक प्रात्यक्षिकास यशस्वीरित्या कसे तोंड द्यावे याबाबत सदरील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. ट्रेनींग अॅण्ड प्रोजेक्ट रायटिंगची बेसिक संकल्पना, लिखाणाच्या पायऱ्या व मौखिक प्रात्यक्षिका दरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या पद्धती बाबत सखोल माहिती दिली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रा. डॉ. जी. टी. वाघमारे यांनी दिले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी.डी. करे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार
प्रदर्शन डॉ. शिवदत्त विभुते, वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. सुग्रीव फड, डॉ. ललीता यडपलवार, डॉ. अतिष राठोड, डॉ. किशोर चौधरी, डॉ. आनंद देशपांडे, प्रा. किरण वाघमारे, प्रा. सीमा शिंदे, प्रा. महेविश पठाण, प्रा. सय्यद पठाण व प्रा. सौरभ येवलीकर व वाणिज्य विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतःच्या कौशल्यांचा विकास करुन व्यवस्थापन क्षेत्रात गरुड झेप शक्य :- डॉ. विनीत दाणी
नांदेड :- दिनांक 26 एप्रिल 2022. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात वाणिज्य विभाग तर्फे, व्यवस्थापन क्षेत्रातील रोजगार संधी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. विनीत दाणी, व्हिजेआयएम, हैद्राबाद यांनी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या रोजगार संधी बद्दल सविस्तर माहिती दिली. उत्पादन व सेवा विपणनाचे प्रभावीपणे करण्यासाठी बहुउद्देशीय कंपन्याच्या प्रभावी पद्धतीबद्दल देखील माहिती दिली. स्वतःच्या कौशल्यांचा विकास करुन व्यवस्थापन क्षेत्रात गरुड झेप घेणे सहज शक्य आहे असे त्यांनी प्रतीपादीत केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आतिष राठोड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. किशोर चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवदत्त विभुते, डॉ. ललीता यडपलवार, प्रा. सय्यद पठाण, डॉ. बिबीशन करे, डॉ. सुग्रीव फड, डॉ. जीवन मसुरे, प्रा. किरण वाघमारे, डॉ. आनंद देशपांडे, प्रा. सीमा शिंदे, प्रा. महेविश पठाण, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैशाली परणकर, स्नेहल राठोड, प्रबोध कौठेकर, महेश जोशी, पुनम शर्मा, श्रुती गवारे, अर्चना कंधारकर, दीपाली चित्ते, नम्रता परदेशी, दीपा यादव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.